केतन भोज यांच्या मनगटावर घड्याळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्हा सचिव पदी नियुक्ती

 


मुंबई/लोकनिर्माण ( शांत्ताराम गुडेकर)


      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षश्रेष्ठींच्या संमतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्हा सचिव पदी केतन भोज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲड.निलेश भोसले आणि मुंबई प्रदेश सचिव धनंजय आंबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष भुषण शेलार यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन मुंबई येथे भोज यांची नियुक्ती करण्यात आली.


 


     यावेळी त्यांनी या पदाचा उपयोग सर्वसामान्य तळगळातील जनतेच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी व विविध सामाजिक विकासात्मक कामे करण्यासाठी करेल असा विश्वास भोज यांनी व्यक्त केला.केतन भोज हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी कोकणात देखील अनेक विकासात्मक कामे केली आहेत.तळगळातील सर्व सामान्य लोकांचे विविध प्रश्न सोडवण्यावर भोज यांनी नेहमी भर दिला आहे.याचीच दखल घेत केतन भोज यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच भोज हे गेली अनेक वर्षे विविध सामाजिक संस्थांवर कार्यरत असून त्यांना आतापर्यंत त्यांच्या कार्याची दखल म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.