आमदारकीला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल संगमेश्वर तालुक्याला रुग्णवाहिका केली प्रदान


देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)
    चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी आमदारकीला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल संगमेश्वर तालुक्याला रुग्णवाहिका प्रदान केली. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी करण्यात आला. 
     तहसीलदार कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाचा काळ असल्याने रुग्ण संख्या देखील वाढत आहे. यासाठी रुग्णवाहिकेची गरज आरोग्य विभागाला विशेषत: देवरुख ग्रामीण रुग्णालयाला आहे. याची गरज ओळखून श्री. निकम यांनी रुग्णवाहिका तालुक्याला दिली आहे. या सोहळ्याप्रसंगी माजी राज्यमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने, जि. प. अध्यक्ष रोहन बने, काँग्रेसचे नेते अशोक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवती अध्यक्षा सॊ. दिशा दाभोळकर,  शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाडिक, जनता दल जिल्हाध्यक्ष युयुत्सू आर्ते, पं. स. सभापती सुजित महाडिक, मनसे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, तहसीलदार सुहास थोरात, वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदिप माने, विवेक शेरे, बापू शेट्ये यांसह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


           
    यावेळी रविंद्र माने यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेची किल्ली डाॅ. माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. कोरोना काळात चांगले काम करणार्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी कोरोना योद्धा म्हणून प्रमाण पत्र देण्यात आले.
   याचप्रमाणे तहसीलदार यांनाही तालुक्याच्या चांगल्या कामाबाबत प्रमाणपत्र देण्यात आला. तालुक्याची गरज ओळखून रुग्णवाहिका दिल्याबद्दल आ. निकम यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सुत्रसंचालन बाळू ढवळे यांनी केले.