वाहतूक व्यवसाईकांच्या सदैव  पाठीशी राहणार : भास्करराव जाधव

           
चिपळूण/देेेवरुख(संदीप गुुुडेकर)


       चिपळूण, खेड तालुका वाहतूक व्यावसायिक संघाच्या आज चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार श्री. भास्करराव जाधव यांना आग्रहपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात आज राजकारणात विविध पदे भूषवित असलो तरी आपण एक ट्रक व्यावसायिक होतो, असे सांगून ४० वर्षांपूर्वीची गाड्यांची स्थिती आणि आज बदललेली परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केले आणि अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचवेळी वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने एक निश्चित भूमिका घ्यावी, आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. विक्रांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य तथा संघटनेचे उपाध्यक्ष श्री. अरुण चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष श्री. बुवा सावंत, उपाध्यक्ष श्री. संभाजी खेडेकर आदी उपस्थित होते.