बंद भिमा पाटस सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा या करता राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटस(ता.दौंड.जि.पुणे) येथे जागरण गोंधळ घालुन केले आंदोलन.

 


पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे) 
  पुणे जिल्ह्यातील बंद भिमा पाटस सहकारी साखर कारखाना येथे माजी आमदार रमेश  थोरात यांच्या नेतृत्वाखाली दौंड राष्ट्रवादी काँग्रेस ने जागरण गोंधळ घालुन आंदोलन करण्यात आले .
     कामगारांचे थक्कीत पगार व ऊस उत्पादक शेतकरी यांचे विविध प्रश्नांन व दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे  व ऊस गाळप होऊन ऊस शिल्लक राहिल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कारखाना सुरू होणे गरजेचे आहे असे माजी आमदार रमेश थोरात म्हणाले.
यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ऊस उत्पादक शेतकरी व नागरिक उपस्थितीत होते. 
पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे राष्ट्रवादी दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार अशोक दिवेकर हनुमंत वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले.


   
      यावेळी बोलताना रमेश थोरात म्हणाले कि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले 36 कोटी रुपये मदत दिली तरीही  कारखाना सुरळीतपणे सुरू होऊ शकला नाही हे मोठे दुर्दैव आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सारिका पानसरे. दौंड पंचायत समिती सभापती आशा शितोळे. उपसभापती नितीन दोरगे.सत्वशिल शितोळे.नितिन थोरात. दिलीप हांडाळ .समाता परिषद दौंड तालुका कार्याध्यक्ष मंगेश रायकर शिवाजी ढमाले. राहुल आव्हाड . संपत भागवत. प्रशांत शितोळे.सुधीर दोरगे.नितीन शितोळे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते .शेतकरी मोठ्याप्रमाणात उपस्थितीत होते.  यावेळी कारखाना सुरू करण्याकरिता विविध विषय असलेले निवेदन  तहसीलदार संजय पाटील यांना  देण्यात आले.