लांजा एसटी डेपोचे वाहक रमेश खानविलकर यांच्या कर्तुत्वाचा व प्रामाणिकपणाचा करण्यात आला सत्कार 

 


रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)


    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील लांजा आगारातील जेष्ठ वाहक तसेच महाराष्ट्र एस टि कामगार सेना  लांजा आगाराचे प्रमुख मार्गदर्शक श्री रमेश गोपीनाथ खानविलकर ( वाहक क्रमांक ३३३७०) हे आपल्या नियोजित  लांजा खोरनिमको   मार्गावर ड्युटी करत असताना ३.६५० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गाडीमध्ये पडलेली सापडली असता अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीने एसटी प्रशासन लांजा आगार व्यवस्थापक श्री संदीप पाटील यांच्याकडे जमा करून, सध्या जगावर आलेल्या कोरोना रुपी आजाराचे संकट असताना त्यात मागील ३ महिने वेतन मिळाले नसताना निव्वळ आपल्या मागील  २२ वर्ष  केलेल्या सेवेचा अनुभव पाठीशी ठेऊन आगारातील सर्व कर्मचारी वर्गाला एक आदर्श दिला. त्याच बरोबर या  महामारीच्या काळात देखील  एसटीचे कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे जनतेची व महामंडळाची सेवा पार पाडत आहेत हे सुद्धा  महाराष्ट्रातील जनतेला, प्रवाशी वर्गाला तसेच अधिकारी वर्गाला दाखवून दिल्याबद्दल  लांजा आगारातर्फे आगार व्यवस्थापक  संदिप पाटील यांच्या वतीने सत्कार व पुढील  वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.


     
       यावेळी स्थानक प्रमुख पाटील मैंडम, आगार लेखाकर सौ कांबळे मैंडम , कार्यशाळा अधिक्षक मलुस्टे, जेष्ठ लिपिक जाधव व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.