दौंड तालुक्यातील यवत गावचे सुपुत्र श्री विकासदादा माने यांची किसान युवा क्रांति संघटना दौंड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती ...

              


                   


पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे)
     पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावचे सुपुत्र श्री विकासदादा माने यांची किसान युवा क्रांति संघटना दौंड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाली असुन नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंत गोसावी यांनी दिले ..
यावेळी बोलताना श्री माने म्हणाले कि कष्टकरी शेतकरी जगाचा पोशिंदा हा नेहमीच अडचणी मध्ये असतो . त्याच्या मालाची कवडी मोल किंमत केली जात आहे . दुधाला योग्य बाजार भाव नाही . ऊसाची भाजी पाल्याची तीच परिस्थिती आहे.  शेतकरी बांधवाना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी किसान युवा क्रांति संघटनेच्या माध्यमातून येथुन पुढे दौंड तालुक्यात मोठी चळवळ उभी केली जाईल ..
       विकास माने यांच्या नियुक्ती मुळे तालुक्यात समाधान व्यकत केले जात आहे त्याच बरोबर अन्याय ग्रस्त  शेतकऱ्यांच्या हि माने यांच्या कडुन देखील खुप अपेक्षा आहेत. पुनर्वसन  कर्जमाफीत राहिलेले शेतकरी व  मालाला योग्य भाव व बाजार पेठ हया व अशा अनेक मुद्द्यांवर माने यांना कामकरावे लागणार आहे  ..त्यांची लढाऊ वृत्ती काम करण्याची पद्धत दांडगा लोकसंपर्क पाहता ते नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी होतील असे बोलले जात आहे..