मृत व्यक्तीच्या नावे धान्य वितरण, रेशन दुकानदाराचा परवाना निलंबित!

 


शिरवली/प्रमोद आंब्रे


     मृत कार्डधारकाच्या नावे परस्पर धान्याची विक्री केल्याबद्दल शिरवली येथील वादग्रस्त रेशन दुकानदाराचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करून त्याच्याकडून १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शिरवलीतील युवक मंडळ पदाधिकार्‍यांच्यावतीने संबंधित रेशन दुकानदारांविरोधात जुलै, सप्टेंबर महिन्यात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली होती.