सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बागुल यांना दलित साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर फॅलोशिप सन्मान दिल्लीत जाहीर!

             


मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे )


        सुनील भिमराव बागुल भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नौकरीत प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.त्यांची  विशेष ओळख म्हणजे ते उत्तम अभिनय कलावंत आणि हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा परोपकारी वृत्तीचा एक माणूस अशी आहे. मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनी वरून प्रसारित झालेली भावस्पर्शी लोकप्रिय "टीव्ही सिरीयल संत गाडगे बाबा, मालिका जेष्ठ साहित्यिक राम उगावकर लिखित आणि निर्माता कमलाकर जगताप  यांच्या दूरदर्शन मालिकांमध्ये सुनील बागुल यांनी लक्षवेधी भूमिका उत्तम साकारली होती.तर ब्रह्मांड नायक, या अध्यात्मक मालिकेत काम केले होते. तसेच काही टीव्ही सिरीयल इवलेसे घरटे, कृष्णलीला  आणि मराठी एकांकिका ढोल वाजतोय, उन्ने पन्नास, कूकूच कू, संशय,  अश्रूंची झाली फुले , तिसरा बाजीराव , संभाजी व  इतर अनेक एकांकिका मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत काम केले. तसेच सुनील बागुल यांनी सर्वोत्कृष्ट एकांकिकाच्या पारितोषिका सोबत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिकही त्यांनी पटकावले. त्यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नोकरीत सुरूवातीला गुणवंत कामगार या नात्याने सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच त्यांनी योगक्षेम महाराष्ट्र मंडळ ते फेडरेशन भारतीय आयुर्विमा महामंडळात अनुसूचित जाती जमाती आॅर्गनायझेशनचे सचिव म्हणून काम पाहिले. माईसाहेब आंबेडकर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिके चे त्या वेळचे धडाकेबाज उपायुक्त गो.रा.खैरनार यांच्या हस्ते सुनील बागुल यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सुनील बागुल यांनी डाव्या विचार सरणीची फेडरेशन या विमा कामगार युनियन मध्ये काम केले.तसेच  भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि भारतीय सर्व साधारण विमा कामगार, आणि अधिकारी, विकास अधिकारी, यांच्या संयुक्त अशा लोकप्रिय "विमा सहकारी बँक" व्यवस्थापकिय  बोर्डे आॅफ डायरेक्टर या नात्याने बॅंकींग क्षेत्रात प्रगती आणि कामगार हितार्थ समाजसेवी स्तुत्य उपक्रमातून समाजसेवा केली आहे. ते शालेय प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण घेत असताना तुळशीवाडीतील आर्य नगर येथील एस.पी शेड जौबनपुत्रा कंपाऊंड रहिवासी अनेक वर्षे पत्राशेडच्या अरुंद घरात कुटुंबीयांसह राहायचे.त्यांचे माध्यमिक शिक्षण सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे वसतिगृहात पूर्ण झाले. तेथेच त्यांच्या मनात लोकसेवेचे निस्वार्थपणाचे बीज रोवले गेले‌. त्यांच्या सर्व कार्यात त्यांना आई वडिलांचा आशीर्वाद व मार्गदर्शन उपयुक्त ठरते असे त्यांनी सांगितले‌. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे.सुनील बागुल आपल्या शाखा कार्यालयात एन.बी.नवा व्यवसाय कामाच्या संबंधी तज्ञ ओळखले जातात. त्यांचे आता नोकरीतील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर एक वर्ष शिल्लक आहे.ते प्रामाणिक पणे आपले कर्तव्य बजावत आहेत. सुनील भिमराव बागुल  यांच्या अभिनय कलावंत आणि समाजसेवक सेवाभावी व्यक्तीमत्व या दृष्टिकोनातून भारतीय राष्ट्रीय पुरस्कार-सम्मान जेष्ठ असे डॉ.एस.पी.सुमनाक्षर यांच्या दलित साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर फॅलोशिप सम्मान या वर्षी नवी दिल्ली येथे पूर्वीच्या तालकटोरा आणि आताच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर जाहिरपणे २४+२५डिंसेबंर २०रोजी बृहन्मुंबई शहरातील सुनील भिमराव बागुल यांना देण्याचं निश्चित झाले आहे. या त्यांच्या कौतुकास्पद, यशस्वी वाटचालीसाठी परिश्रमाचा गौरव अभिमानास्पद आहे.जिंदगी के साथ, जिंदगी के बाद अशा या आयुष्यभराच्या यशस्वी कामगिरीला शुभेच्छा ! दलित साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर फेलाॅशिप सन्मान नवी दिल्ली मध्ये सुनिल बागुल यांना जाहीर करण्यात आला आहे, या निमित्ताने सामाजिक,सांस्कृतिक ,  शैक्षणिक , साहित्य कला, नाट्य , चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी सुनिल बागुल यांना अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना कला क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.