एसटी कर्मचाऱ्यांच्या दुर्दॆवी आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा - आमदार प्रशांत ठाकूर करणार निदर्शने!

 


पनवेल/लोकनिर्माण 
     एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगार मात्र तो ही थकल्यामुळे कंटाळून जळगाव येथील 'एस.टी. कर्मचारी मनोज चौधरी’ व रत्नागिरी येथील ‘पांडुरंग गडदे’ यांनी आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे या विरोधात उद्या दि.१०/११/२०२० रोजी पनवेल एस्.टी. स्थानक येथे सकाळी ठीक १०:०० वा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निदर्शने करण्यात येणार आहेत.