एसटी कर्मचाऱ्यांना आजच एका महिन्याचे वेतन व दिवाळीचा बोनस देणार परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा

 


मुंबई /लोकनिर्माण 


     एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे वेतन मिळालेले नाही नाही त्याबाबत आता शासनाने दखल घेतली असून आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन आजच दिले जाईल अशी घोषणा केली तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिला जाईल असेही जाहीर केले दिवाळी आधी आणखी एका महिन्याचे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले  एसटी महामंडळ नुकसानीत आहे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत शासनाकडे ही निधीसाठी मागणी करण्यात आली आहे तसेच कर्ज घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी संयम बाळगून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेऊ नयेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.