'वणवा मुक्त' गावांच्या' विकासासाठी जादा निधी- देणार आमदार शेखर निकम

             


देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर) 
     
      'वणवा मुक्त' गावाला विकासासाठी जादा निधी देणार असून त्याचा अहवाल पं.स. ला सादर करणार असल्याचे आ. शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी चिपळूण येथे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. पर्यावरणप्रेमी, माजी सभापती शौकत मुकादम यांची ही संकल्पना असून ती आता मूर्त स्वरुप घेत आहे. प्रांत कार्यालयात झालेल्या या बैठकीला उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसिलदार जयराज सूर्यवंशी, माजी सभापती शौकत मुकादम , उपसभापती पांडुरंग माळी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पं.स.कृषी अधिकारी संजय जानवलकर, मानद वन्यजीव रक्षक भाऊ काटदरे, ग्लोबल टुरिझमचे रामशेठ रेडीज, निलेश बापट, प्रकाश उर्फ बापू काणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, वनविभागचे अधिकारी व कृषी विभागचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.