येत्या आठ दिवसात उर्वरीत अनधिकृत बांधकामे न तोडल्यास तोडलेले खोके पुन्हा उभारू शैलेश धारीया यांचा नगरपालिका प्रशासनाला इशारा


खेड /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)


      शहरातील उर्वरीत अनधिकृत खोक्यांवर व वाढीव बांधकामावर पुढील आठ दिवसात कारवाई केली गेली नाही तर आम्ही तोडलेले खोके उभे करू असा इशारा मनसेचा शैलेश धारिया यांनी दिला आहे. प्रशासनाला जर अनधिकृत खोक्यांवर कारवाई करायची होती तर त्यांनी सरसकट करायला हवी होती. त्यांनी ठराविक खोक्यावरच का कारवाई केली याचे उत्तर प्रशासनाने द्यावे ही मागणी करत संतप्त खोकेधारकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे याना घेराव घातला.
       खेड नगरपरिषद प्रशासनाने अनधिकृत खोक्यांवर केलेली कारवाई ही अन्याय कारक आहे. आम्हाला केवळ दोन तासांची मुदत देवून कारवाई केली मात्र आज ही कारवाई का थांबवली असा सवाल खोकेधारक महिलांनी उपस्थित केला आहे. आता तुमची मागणी काय आहे असे माध्यमांच्या प्रतिनिधीनी विचारले असता आम्हाला आमचे खोके आहेत तसे करून द्यावे, ज्या व्यवसायातून आम्ही आमच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो त्याच व्यवसायावर बुलडोझर चालविण्यात आल्याने आता आम्ही खायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
      काल नगरपालिका प्रशासनाने जी कारवाई केली ती पक्षपाती आहे. खोकेधारकांची बाजू मांडण्यासाठी आज माजी आमदार संजय कदम नगरपालिकेत गेले होते. खोकेधारकांवर प्रशासनाने पक्षपातीपणे कारवाई करणे योग्य नसल्याचेही संजय कदम यांनी म्हटले आहे. यावेळी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील उपस्थित होते. संतापलेल्या खोकेधारकांनी मुख्याधिकारी यांना देखील निवेदन दिले आहे.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image