गाव पाड्यांच्या विकासासाठी आता ग्राम सक्षम उपक्रम : आमदार सुनिल भुसारा यांची संकल्पना, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाला शुभारंभ


 मोखाडा /लोकनिर्माण ( पंकजकुमार पाटील )
              मतदारसंघाचा विकास करावयाचा असल्यास गाव पाड्यांचा विकास होणे गरजेचे आहे.यासाठी ग्रामस्तरावरच काम होणे आवश्यक असल्याने आता स्वतःची यंत्रणा आणि अनेक संस्था यांच्या माध्यमातून काम होणे गरजेचे आहे अशी संकल्पना विक्रमगड विधानसभा आमदार सुनिल भुसारा यांनी मांडली असून त्याची सुरवातही झाली आहे आमदार भुसारा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्राम संकल्पना धारतीवर विक्रमगड विधान सभा मतदार संघात आ.सुनिल भुसारा यांनी वाढदिवसाच्या औचित्य साधून प्रयोगिक तत्वावर ग्राम सक्षम पथदर्शी उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली.

       
          या प्रकल्पात गावचा सर्वागीण विकास करण्यासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आले."वरील प्रकल्पास मा आदिवासी विकास मंत्री ना के सी पाडवी यांनी चर्चेअंती तत्त्वतः मंजुरी दिली असून दिवाळीनंतर मा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व मा ना. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्याचे ठरवले आहे".

-सुनिल भुसारा आमदार विक्रमगड विधानसभा