सर्जनशीलतेचा नवाविष्कार दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन झाले.

 खांदा काॅलनी/लोकनिर्माण( रामदास गायधने)


जाई फाउंडेशन संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबई द्वारा आयोजित  सर्जनशीलतेचा नवाविष्कार दिवाळी अंक 2023 चे काली माता हॉल नविन येथे थाटात प्रकाशन पार पडले . याप्रसंगी प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणुन मा. दीपक कांबळी (सुप्रसिद्ध कवी गीतकार) कार्याध्यक्ष डॉ.वर्षा खडसे रणदिवे  तर प्रमुख अतिथी म्हणुन एम. एस. कासार (राज्यकर उपायुक्त) व   मा. अंजली ढमाळ(सल्लागार तथा राज्यकर उपायुक्त) ह्या उपस्थित होत्या सोबतच आबासाहेब कडू लिखित गुवाहाटी एक्सप्रेस या लघुकादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 


  याप्रसंगी कवींनी वास्तविक विषयावर आपली स्पष्ट भुमिका मांडावी आणि सजग समाजनिर्मितीसाठी लिहित राहावे अशी भुमिका मान्यवरांनी मांडली या सोहळ्याचे सूत्रसंचालन अश्विनी अतकरे व मनिषा शिरटावेल यांनी केले. प्रकाशन सोहळ्यात शब्दवेल महाविजेता स्पर्धेतील विजेत्यांन सन्मानीत करण्यात आले. शब्दानंद कविसंमेलनामध्ये अध्यक्ष ज्येष्ठ कवी शिवाजी गावडे  तर प्रमुख अतिथी कमलाकर  राऊत व शंकर घोरसे होते तर सूत्रसंचालन अमोल चरडे यांनी केले. दुपारच्या सत्रात अक्षरलेणी  कविसंमेलनामध्ये हास्यकवी नितीन वरणकार यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. संजय कावरे, मा.सुरेश नागले, नलिनी पवार ललिता गवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात हास्याची चौफेर आतषबाजी झाली. याप्रसंगी ढीगभर लिहिण्यापेक्षा कसे मूठभर दर्जेदार लिहिण्याचा व अभ्यासपूर्ण लिहिण्याचा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक सुरेश नागले  यांनी उपस्थितांना दिला या सत्राचे सूत्रसंचालन जयमाला चव्हाण यांनी केले. शेवटच्या सत्रात सर्व निमंत्रित कवी व कार्यकारिणी सदस्य यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले केंद्रिय संघटक देवेंद्र इंगळकर यांनी आभार प्रदर्शन व ईश्वरी अतकरे हिने सादर केलेल्या विश्व प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दवेलचे अध्यक्ष प्रविण बोपूलकर सचिव अश्विनी अतकरे सहसचिव रामदास गायधने, केंद्रिय संघटक देवेंद्र इंगळकर, युथ विंग अध्यक्ष अमोल चरडे, रायगड जिल्हाध्यक्ष विलास पुंडले, उपाध्यक्षा योगिनी वैदू, संघटक प्रतिभा मंडले यांनी मोलाची भुमिका पार पाडली.