शास्त्री नदीतील मासेमारीसाठी केमिकलयुक्त पावडरचा वापर, *नायरी ते कारभाटले परिसरात असंख्य मृत माशांचा खच पडला


संगमेश्वर /लोकनिर्माण(धनंजय भांगे)


       शास्त्री नदीच्या सह्याद्री खोर्‍याच्या पायथ्याशी असलेल्या नायरी परिसरात अज्ञाताने मासेमारीसाठी केमिकलयुक्त पावडरचा वापर सुरू केला आहे. नायरी ते कारभाटले परिसरात असंख्य मृत माशांचा खच पडला असून पंचक्रोशीत दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. बहुतांशी मृत मासे अंगावर पांढरे पट्टे असलेले सापडले असून उर्वरित मासे सडलेल्या अवस्थेत आहेत. कोंडउमरे ते हेदली गावापर्यंत मृत माशांची संख्या सर्वाधिक असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शास्त्री नदीतील पाणी जनावरे, कपडे धुण्यासाठी वापरले जाते. मासे मारण्यासाठी टाकलेल्या केमिकल पावडरमुळे नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात दुषित झाले आहे.