कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न .


ठाणे (विशाल मोरे/शिवकन्या नम्रता शिरकर )


 


कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान च्या माध्यमातून आंबडस ग्रामस्थ विकास मंडळ - (मुंबई) व दिपक फाउंडेशन आणि अनविकशा ब्लड बँक यांच्या सहकार्याने ठाणे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला रक्त दात्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकुण ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


         
       या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नौपाडा पोलीस स्टेशनचे सन्मानीय अधिकारी श्री.अविनाशजी सोंडकर साहेब लोकमान्य नगर पाडा नं २ विभागीय नगरसेवक श्री.दिलीप बारटक्के उप विभाग प्रमुख हेमंत राठोडेकर आंबडस ग्रामस्थ विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.वामन मोरे  कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्री.वसंत निकम कार्यकारी सदस्य युवा पत्रकार श्री.दिलीप शिंदे उपखजिनदार श्री.संदिप मोरे कमिटी सदस्य श्री.दशरथ मोरे व श्री.किरण पाष्टे  दिपक फाऊंडेशन अनविकक्षा ब्लड बँक सह डायरेक्टर डॉ रमेश शहा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.ज्या रक्तदात्यांनी रक्त दान केले त्यांना  प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. या शिबिराला महिलांनीही आपलं रक्तदान करून आपल्या समाजाप्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली.ज्या ज्या रक्त दात्यांनी आपलं रक्तदान दिलेलं आहे.त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.


Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image