गवळी समाजातील तरुण व तरुणांसाठी ज्ञानवर्धिनी -ऑनलाईन सत्रातील पहिले सत्र संपन्न

                 


देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर) 


       गवळी समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री निलेश तुकाराम गवळी यांच्या संकल्पनेतून गवळी समाजातील तरुण व तरुणांसाठी ज्ञानवर्धिनी -ऑनलाईन सत्रातील पहिले सत्र शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२० ला सायंकाळी ७.३० ते ९ या कालावधीत झाले. हे सत्र गुगल मिट (Google Meet) या सोशल अँपच्या माध्यमातून घेण्यात आले. ह्या पहिल्या सत्रात *भारतीय शेअर बाजार ह्या विषयावर मार्गदर्शन श्री. प्रशांत काबदुले यांनी केले. ह्या प्रसंगी महाराष्ट्रातून गवळी समजातील अनेक तरुण तरुणीचा उतस्फुर्त सहभाग लाभला.  शेअर मार्केट ची तोंड ओळख आणि मार्केट मध्ये काम करत असताना घ्यावयाची काळजी व जोखिम या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. व उपस्थितांच्या सर्व शंकांचे निरसण याप्रसंगी श्री. प्रशांत काबदुले यांनी केले. *गवळी समाज प्रतिष्ठान* च्या वतीने येणाऱ्या काळात ज्ञानवर्धिनी ह्या सत्रात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्यवसायिक व करीअर संदर्भात मार्गदर्शन पर कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येतील असे श्री. निलेश गवळी यांनी सांगत उपस्थितांचे आभार मानले.


Popular posts
जनसेवेचे मौल्यवान काम काँग्रेसचे सुधिर शेठ शिंदे सारखेच नेते करू शकतात -अॅड विजयराव भोसले
भारतीय डाक विभागाची अपघाती योजना नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन
Image
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा* मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार* प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ई पॉस अट शिथिल                                       - छगन भुजबळ
अखंडित दुग्धव्यवसाय करणारा गवळी समाज
Image