पालघर जिल्ह्यात घरोघरी योग पोहोचवणार: स्वामी परमार्थ देव *वसई येथे एक दिवसाचे मोफत इंटिग्रेट योग शिबिर संपन्न

 

वसई/ प्रतिनिधी



     हरिद्वार पतंजली योग पिठातून योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले स्वामी परमार्थ देव व आचार्य चंद्रमोहन यांनी वसईत देखील भेट देऊन  योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पालघर  जिल्ह्यातील योग समितीच्या कमिटी मधील सर्व योगशिक्षकांना मार्गदर्शन केले  तसेच इंटिग्रेट योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले हा कार्यक्रम वसई तालुक्यातील माणिकपूर येथील समाज उन्नती हॉलमध्ये संपन्न झाला. त्यावेळी  आलेले आचार्य चंद्रमोहन,  भारत स्वाभिमान पतंजली योगपीठ युवा भारत चे राज्य प्रभारी सचिन जी जिल्हा प्रभारी सुरेश जी पोपटराव कदम जी, अजय छाबरा इत्यादी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. 



    वसई तहसील येथील समाज उन्नती मंडळाच्या हॉलमध्ये नुकताच पतंजली योगपीठ चे कुलपती स्वामी परमार्थ देवजी व आचार्य चंद्रमोहन जी यांच्या उपस्थित इंटिग्रेट योगाचे प्रशिक्षण व पालघर डहाणू नायगाव नालासोपारा वसई येथील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये स्वामी परमार्थ देव यांनी स्वामी रामदेव बाबा ,आचार्य बालकृष्ण यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र दौऱ्यावर योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आले आहेत योगाद्वारे, योग ,आयुर्वेदिक ,यज्ञ हवन, प्राणायाम  याद्वारे सर्व गंभीर रोगांचे  उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट स्वामी रामदेव बाबांचे असल्याचं त्यावेळी त्यांनी बोलून दाखवले. त्याचबरोबर कोरोना काळात योगा व आयुर्वेदिक शस्त्रानेच लाखो लोकांचे प्राण वाचविले आहेत.  स्वामी रामदेव बाबा यांनी इंटिग्रेट योग ही नवीन पद्धती योगामध्ये आणली असून त्याद्वारे आजारी व्यक्तीला लवकर बरा होण्यासाठी सहकार्य मिळू लागले आहे आणि ते संशोधनाअंती सिद्ध देखील झाले आहे.  या पद्धतीमुळे रोगी पूर्णपणे बरा होतो. भारताला हजारो वर्षापासून ची योग परंपरा आपल्या ऋषीमुनी घालून दिली आहे .योग, प्राणायाम इंटिग्रेट आयुर्वेद अशा चहुबाजूनी रोगावर उपचार केल्यास अनेक गंभीर स्वरूपाचे आजार कायमस्वरूपी बरे झालेले आहेत व बरे होतात .याला वैज्ञानिक आधार असून योगा द्वारे केलेली प्रक्रिया व यज्ञ याचा शरीरावर होणारा परिणाम याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने  विवरण करून ते विज्ञानाच्या कसोटीवर घासून पुसून करण्यात आले आहेत व त्याद्वारे असे सिद्ध झाले की योगामुळे  रोगाचे समूळ उच्चाटन होते व रोगी पूर्णपणे बरा होतो असा दावा स्वामी रामदेव बाबा  करतात व ते सत्य आहे असे प्रतिपादन स्वामी परमार्थ देवजी यांनी यावेळी केले.