राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन


राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार)

 राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने आज  उत्कर्ष विद्यामंदिर खरवते ता राजापूर व निर्मला भिडे जनता विद्यामंदिर राजापूर येथे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 



               कार्यक्रम दरम्यान चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम सांगून व कायद्याची माहिती देऊन सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सायबर क्राईम,  मोबाईल वापराचे फायदे व तोटे, फेसबुक व्हॉटअँप, इंस्ट्राग्राम इ. द्वारे होणारे गुन्हे याबाबत मार्गदर्शन केले.