ज्येष्ठ नागरिक संघ पोलादपूर यांचा २२वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 पोलादपूर/लोकनिर्माण (समीर सकपाळ) 

 पोलादपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन होऊन २१ वर्षे झाल्यामुळे सदर संघाचा २२ वा वर्धापन दिन ज्येष्ठ नागरिक सभागृह पोलादपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

  याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राम भुतकर, पोलादपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक युवराज म्हसकर, बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखाधिकारी गजेंद्र घाडगे, विद्यामंदिर पोलादपूर चेअरमन निवास शेठ, डॉ. राजेश सलागरे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा कांचन बुटाला, उपाध्यक्षा गोविलकर बाई उपस्थित होत्या.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन बुटाला यांनी करताना ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाटचालीची, केलेल्या कार्याची तसेच भविष्यातील योजनांची माहिती दिली.

    याप्रसंगी श्री. युवराज म्हसकर साहेब  यांनी जेवायला ताट द्या, पण बसायचा पाट देऊ नका, म्हणजेच मुलांना, आपल्या वारसांना मदत करा. पण त्यांना सर्वस्व देऊ नका. आपल्या सुरक्षिततेसाठी काही भाग आपल्या ताब्यात असायला हवा असे सांगितले.

  डॉ. राजेश सलागरे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवित असलेल्या वैद्यकीय योजनांची माहिती तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर जेष्ठांसाठी करूया अशी ग्वाही  सभागृहाला दिली.

  श्री. निवास  शेठ यांनी ज्येष्ठांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दलच्या हृदयद्रावक गोष्टी सांगून काळजी घेण्याचे आवाहन केले.

  श्री.गजेंद्र घाडगे यांनी बँकेमार्फत ज्येष्ठांना मिळणाऱ्या लाभांबद्दल माहिती दिली.

  श्री.मंगेश नगरकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

  सदर प्रसंगी सर्व उपस्थितांना तिळगुळ आणि श्रीफळ देण्यात आले. गोविलकर बाई यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला ५००० रुपयांचा धनादेश दिला.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुनिल पवार यांनी केले. यावेळेस त्यांनी उत्स्फूर्तपणे ज्येष्ठ नागरिकांवर कविता करून उपस्थितांची मने जिंकली.

  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाळू शिंदे, प्रकाश मांढरे, कांचन तलाठी,  सुवर्णा दरेकर, विकास तलाठी , अनिल मोहिरे , चंद्रकांत पालकर , मडले सर , डोळस, नगरकर , सुरेश शेठ , राम भाऊ सुकाळे , चंद्रकांत बुटाला , शैलेश तलाठी ,कासार , शकुंतला पालांडे , प्रमिला सकपाळ , अरुणा सुकाळे , गुलाब वंडकर , गुलाब शेठ , लता शेठ , भारती बुटाला , सुधा बुटाला , शर्मिला बुटाला, प्रभा तलाठी , चारू साबळे , पुष्पा साबळे , जाधव बाई , शैला बुटाला , प्रेम टोलमारे , आशा गांधी , मंगला विद्वांस ,प्रसन्न बुटाला, अथर्व बुटाला यांनी मेहनत घेतली.