चारकोपमध्ये दशावतारी नाट्य महोत्सव व जत्रोत्सव


मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाच्या वतीने नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चारकोप सेक्टर ३ येथील ओंमकारेश्वर मैदानात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी व माजी नगरसेवीका यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

चारकोप गोराई परिसरातील कोकण वासियांना  ही नववर्षाची सांस्कृतिक आणि सामाजिक भेट असल्याचे अध्यक्ष भरत नाईक, सचिव प्रकाश परब आणि खजिनदार दिनेश सावंत यांनी सांगितले.

चारकोप गोराई म्हाडा वसाहतीत कोकणातील समाज मोठया प्रमाणात आहे. १९९२ मध्ये कौटुंबिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. दरवर्षी नव्या वर्षाच्या स्वागताला कलाकारांना,व्यावसायिकांना चालना मिळावी, तरुणांमध्ये दशावतारी नाटकांची आवड निर्माण व्हावी. कोकण संस्कृती वाढीस लागावी,  या हेतूने दशावतारी नाटय महोत्सव व सुप्रसिध्द मालवणी कोकणी खाद्य पदार्थांच्या बाजाराचे आयोजन दिनांक १ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. गोपुत्र गोकर्ण, गजकर्ण गजासुर, गजाली भुताच्यो, भीमाची पायरी,श्रीयाळ चांगुणा, दिव्य तेजधारी भागर्व, पुष्प हद्दपार आणि महिलांची डबल बारी अशा सुप्रसिध्द दशावतारी नाटके सादर केली जाणार आहे.

कोकणवासीयांसह नाट्य रसिकांनी नव वर्षाच्या सुरुवातीला मनसोक्त आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाचे सल्लागार श्रीकांत कवठणकर यांनी केले आहे.