अवैध गोवा बनावटीची दारू विक्री ; एका वर गुन्हा दाखल


राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार)

         मौजे डोंगर गणेश वाडी ता राजापूर येथे गोवा बनावटीची दारू विक्री करीत असताना राजापूर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे . 

         ही कारवाई ६ जानेवारी रोजी सायंकाळी  डोंगर गणेशवाडी येथे एका घराचे बाजूला असलेल्या गवताच्या गोठयाजवळ ( ता . राजापूर ) येथे करण्यात आली. *राजेंद्र सुरेश शिंदे (३९ , रा . मु पो डोंगर गणेशवाडी, ता राजापूर जि रत्नागिरी* याच्यावर गुन्हा दाखल केला आहे . याप्रकरणी राजापूरचे पोलिस शिपाई नितीन चंद्रकांत फाळके ( 30 ) यांनी फिर्याद दिली आहे . 

        सदरची कारवाई श्री जनार्दन परबकर पोलीस निरीक्षक राजापूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार  हर्षदा चव्हाण, पोलीस नाईक सचिन वीर यांनी केली आहे.

      अधिक तपास महिला पोलीस हवालदार  हर्षदा चव्हाण ह्या करीत आहेत.