राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात सातारा जिल्ह्यास प्रथम क्रमांक

 

पाटण लोकनिर्माण ( श्रीगणेश गायकवाड)

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातरा ज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट जिल्हा म्हणून प्रथम क्रमांकाने सातारा जिल्ह्याला गौरविण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राजभवन कार्यालयातर्फे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर हे १९ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत घेण्यात आले होते. या शिबिरात शिवाजी विद्यापीठाअंतर्गत सातारा जिल्ह्याने सहभाग घेतला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एन. एस. एसच्या २५ स्वयंसेवकांनीसहभाग घेतला. शिबिरात उत्कृष्ट जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला गौरविण्यात आले.



  यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल. माहेश्वरी हे होते. राज्याचे संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वानंजे, एन.डी. आर. एफचेअधिकारी ईश्वर मते, रामदास ठंनगे सातारा जिल्ह्याचे संघ व्यवस्थापक आणि बी. डी. कॉलेज एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी .डॉ. जी एस पटटेबहादुर सहभागी झाले होते. राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट जिल्हा म्हणून प्रथम क्रमांकाने सातारा जिल्ह्याला गौरविण्यात आल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रो. कुलगुरू.डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही एन शिदे, संचालक रा. से. योजनाचे प्रा. अभय जायभाये, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचेसंचालक सत्यजितसिंह पाटणकर, कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, संचालक संजीव चव्हाण, याज्ञसेन पाटणकर प्राचार्य डॉ.एस डी पवार यांनी अभिनंदन केले.