कल्याण पूर्व येथे विश्वशांती महिला मंडळाच्या वतीने संयुक्त जयंती साजरी


 लोकनिर्माण न्यूज कल्याण प्रतिनिधी सौ.राजश्री फुलपगार



 दिनांक १२/१/ २०२३ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता  धम्मदीप बुद्ध विहार (चिंचपाडा) येथे राजमाता जिजाऊ आणि माता सावित्रीबाई फुले माता रमाई यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी  प्रमुख पाहुण्या श्रीमती सारिका गायकवाड आणि आशाताई तिरपुडे उपस्थित होत्या. त्यानी सावित्रीबाई माता रमाई माता जिजाऊ यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये विश्वशांती मंडळाचे सौ.नीलिमा वंजारी(अध्यक्षा) मीनाक्षी आहेर (सचिव) मीरा वासनिक(उपाध्यक्ष) आणि इतर सर्व मंडळाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्रिसरण पंचशील आणि बुद्ध वंदना  घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मंडळातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी  माता रमाई माता सावित्री माता जिजाऊ यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. सह भोजनाचा कार्यक्रम शेवटी करण्यात आला  आणि कार्यक्रमाची सांगता झाली.