पाटण तालुका पत्रकार संघाचा पत्रकार दिन उत्साहात साजरा

       

      पाटण/ लोकनिर्माण ( श्री गणेश गायकवाड)

 पाटण तालुका पत्रकार संघाने विश्राम गृह पाटण येथे ६ जानेवारी पत्रकार दिन उत्साहात साजरा केला. पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंदराव देसाई,   कार्याध्यक्ष शंकर मोहिते, उपाध्यक्ष संजय कांबळे, जयभिम कांबळे सचिव भगवंत लोहार, म.प.प महिला आघाडी सरचिटणीस विद्या म्हासुर्णेकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सायबर सेलचे प्रदेश अध्यक्ष सारंगबाबा पाटील, पाटण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजिसिंह पाटणकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, तहसिलदार रमेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोरख शेलार, नाभिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अधिकराव चव्हाण तसेच पक्षीय नेते, राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, मित्रमंडळ आदी मान्यवर हितचिंतकांनी उपस्थित राहून व पाटण तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकारांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.. आणि पत्रकारांचा यथोचित सन्मान केला. तसेच अनेकांनी प्रत्यक्ष फोन करून, सोशल मीडियावर पत्रकरांवर शुभेच्छांचा वर्षाव पाडला.



       याबरोबर श्रीमंत नागोजीराव पाटणकर वाचनालय पाटण आणि बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण यांनी देखील पत्रकारांना बोलवून पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान केला. ६ जानेवारी पत्रकार दिन हा दिवस सर्व पत्रकरांसाठी आनंददायी ठरला. यावेळी जेष्ट पत्रकार पाटण तालुका पत्रकार संघाचे संस्थापक ए.व्ही देशपांडे सर यांनी पाटण तालुका पत्रकार संघाची 1983 साली झालेली स्थापना, त्यापूर्वीची पाटण तालुक्यातील खडतर पत्रकारिता आणि पत्रकार संघाची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल याबद्दल मार्गदर्शन करुन पत्रकार संघाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. याठिकाणी आधार सामाजिक संस्था पाटण, सुशिला सामाजिक संस्था रामापुर-पाटण, शिवम सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा संस्था कोकिसरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना ठाकरे गट, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, सातारा जिल्हा बैंकेचे पदाधिकारी, मित्रमंडळ आदी मान्यवरांनी पत्रकारांना शुभेच्छा देऊन सन्मानित केले.

               आजच्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून पाटण पासून लांब पल्यातील पत्रकार संघाचे खरे शिलेदार तारळे विभागातून एकनाथ माळी, जयवंत यादव, यशवंत बेंद्रे, विश्वनाथ महाडिक, ढेबेवाडी विभागातून जयभिम कांबळे, श्रीकांत पाटील, पोपटराव झेंडे, चाफळ विभागातून आनंदराव देसाई, के.आर. सांळुखे, मल्हारपेठ विभागातून विलासराव माने, योगेश हिरवे, राजेंद्र लोंढे, दादासाहेब पवार, जालिंदर सत्रे, दिवशी मधून भगवंत लोहार, कोयना विभागातून निलेश सांळुखे, मणदुरे - चापोली विभागातून राजेंद्र सावंत, संजय कांबळे, सिताराम पवार, आणि पाटण मधून जेष्ट पत्रकार ए.व्ही. देशपांडे, संपतराव देसाई, राजेंद्र पवार (गुरुजी), विक्रांत कांबळे, के.डी.चव्हाण, प्रविण जाधव, श्रीगणेश गायकवाड, पी.के. कांबळे, संदीप भोळे, नितीन खैरमोडे, विद्या म्हासुर्णेकर, शंकर मोहिते असे सर्वजण उपस्थित होते. 

         पत्रकार दिन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पत्रकार संघाचे मावळे नितीन खैरमोडे, संजय कांबळे, विलासराव माने, जयभीम कांबळे, आनंदराव देसाई, शंकर मोहिते विक्रांत कांबळे, संदिप भोळे, पी.के. कांबळे यांनी परिश्रम घेतले.