लवकरच वाढणार सोयाबीनचे दर पवन ढास पाटील

 


बीड/ लोक निर्माण (पवन ढास पाटील)




नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे भाव ६ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे भाव 6 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद, ७ नोव्हेंबर : फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनला ६ हजार रुपये भाव होता मात्र नंतर भाव कमी झाले. यंदा परतीच्या पावसाने सोयाबीनच्या पिकावर मोठे संकट आले होते. पावसामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. पिकाच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा असतानाच सोयाबीनचे भाव आज औरंगाबाद बाजार समितीमध्ये 5 हजार रुपयांवरून ५ हजार ३०० रुपये झाले आहेत. नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे भाव ६ हजारापर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


सोयाबीनला चांगला भाव असतो. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन हे पीक घेतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनच्या किंमती ७ हजारांवर गेल्या होत्या. यामुळे खरीप हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाला प्राधान्य दिलं होतं. एकट्या मराठवाड्यामध्ये २३ लाख ९८ हजार ९६७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा पावसामुळे आणि त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे राज्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये हाताशी आलेल्या सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले. या मध्ये सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं.