बिबट्याच्या धाकामुळे सायंकाळनंतर घराबाहेर पडणे झाले धोक्याचे, नागरिक एकवटले

 

राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार)

राजापूर येथील नायब तहसिलदार व भटाळीतील (समर्थनगर) रहिवाशी सौ. दीपाली पंडित यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडणे धोक्याचे झाल्याने या बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडावे, अशी मागणी नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने राजापूर वनविभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सद्यस्थितीतील राजापूर शहर व परिसरामध्ये बिबट्याचे नागरिकांना वारंवार दर्शन होत आहे. त्यातही प्रामुख्याने भटाळीतून कोर्टाकडे वर जाणारा रस्ता व पुढील बाजूला स्मशानभूमीकडून गुरववाडीत जाणारा रस्ता येथे प्रामुख्याने त्याचा वावर लक्षात येत आहे.


Popular posts
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image