एसटी महामंडळाच्या बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट

 

मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार आहे. महिलांना प्रवासात सरसकट पन्नास टक्के सवलत दिल्याने एसटीचे प्रवासी निश्चितच वाढणार असून एसटीला उलट फायदाच होत आहे.त्यामुळे राज्याची ग्रामीण वाहीनी असलेल्या एस महामंडळाची प्रवासी संख्या वाढणार आहे. अलिकडेच महामंडळाने एसटीतून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास घडविण्याचा निर्णय घेतल्याने एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. एसटी जरी प्रवाशांना सवलत देत असली, तरी या सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकार करीत असते. त्यामुळे एसटी महामंडळाचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.