जमीन व्यवहारात तब्बल ४३ लाख ६० हजार रुपयाची फसवणूक, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 

गुहागर लोकनिर्माण प्रतिनिधी 

गुहागर जमिनीच्या खरेदीमध्ये पैसे घेऊन फिर्यादीच्या नावावर कुलमुखत्यार करून विकलेल्या जमिनीचे दुसरे कुलमुखत्यार एजंटने स्वतःच्या नावावर करून ती जमीन पुन्हा विक्रीस काढून तब्बल ४३ लाख ६० हजार रुपयाची फसवणूक केली. गुहागर पोलिसांनी आरोपी रमजान साल्हे, अमीर साल्हे, आणि मुस्ताक तांडेल यांच्या विरोधात भादवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुहागर पोलीस स्थानकात याबाबत 

सॉफ्टवेअर इंजिनियर अब्दुल मुतल्लीब ताज अहमद साल्हे यांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.

शृंगारतळी येथील एजंट आरोपी रमजान इस्माईल साल्हे, अमीर गणी साल्हे, मुस्ताक इसाक तांडेल यांनी अब्दुल साल्हे यांना २९ जानेवारी २०२२ रोजी अब्दुल साल्हे सदर जागेचे कुल मुख्यालपत्र करून दिले होते.या जागेवरील सहहिस्सेदारापैकी एकाचा मृत्यू झाल्याने या संधीचा फायदा घेत आरोपी रमजान साल्हे, अमीर साल्हे, मुस्ताक तांडेल यांनी सदर जागेचे कुलमुखत्यार एकमेकांच्या संगनमताने स्वतःच्या नावे करून सदर जागा विक्रीस काढली होती.