महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका आयोजित जागतिक महिला दिन, मनसे वर्धापन दिन आणि तिथीनुसार शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, भव्य मिरवणुकीत कला, संस्कृतीचे सादरीकरण

 

गुहागर/ लोकनिर्माण ( विनोद जानवलकर) 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त मनसैनिकांच्या सहकार्याने  मनसे पक्षाचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर,  रत्नागिरी जिल्हा (मध्य) अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हा सचिव संतोष नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन तसेच मनसे वर्धापन दिन आणि तिथीनुसार शिवजयंती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दि. ८ मार्च रोजी कर्दे मनसे शाखा येथे महिलांसाठी हळदीकुंकू, समारंभ, गुरुवार दि. ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिनानिमिला गुहागर तालुका मध्यवर्ती संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा , आरती,प्रसाद, सायं. ६.३० वा. सांब सदाशिव सभागृह, (पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण) येथे प्रत्येक समाजाचा उत्कर्ष हे मनसेचे उद्दिष्ट याच उद्दिष्ट पूर्तीचा भाग म्हणून गुहागर तालुक्यातील सर्व समाजातील तालुकाध्यक्षांचा सत्कार  सोहळ्यात महेश नाटेकर (खारवी समाज),सुभाष भाई रजपूत (गोसावी समाज),मुकुंद पानवलकर (लोहार समाज),वसंत देऊडकर (सुतार समाज), विठ्ठल बावा  भालेकर (भोई समाज), प्रकाश कारेकर (सोनार समाज), अरविंद  पालकर (कुंभार समाज), संजय पवार (नाभिक समाज), महेंद्र महाडिक (गवळी समाज), विजय जानवळकर(चर्मकार समाज) विनोद पवार (बेलदार समाज) रवींद्र चंद्रकांत कोतवडेकर (गुरव समाज ), रमेश राजाराम नेटके (कोष्टी समाज ),  रामचंद्र हुमणे गुरुजी ( कुणबी समाज), भरतशेठ शेट्ये  (भंडारी समाज), आनंद खरे (ब्राह्मण समाज), गजानन वेल्हाळ (शिंपी समाज), प्रकाश शिर्के (मराठा समाज), सुनील जाधव (बौद्ध समाज), प्रकाश झगडे (तेली समाज), आनंद पवार (नंदीवाले समाज), साबीर भाई साल्हे (मुस्लिम समाज), प्रशांत शिरगावकर  (वैश्य समाज), सुरेश जसकरण मर्दा (महेश्वरी समाज), प्रवीण पटेल (पाटीदार समाज) यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये डॉ.  योगिता खाडे  (आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू ), श्रीमती माधवी अरुण जाधव (संरक्षण अधिकारी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन), श्रीमती रसिका राजन दळी (उद्योजक महिला मातीची भांडे जिल्हास्तरीय पुरस्कार),श्रीमती पुनम राजेंद्र साळवी (वकील,संघटना खजिनदार), डॉ.  रूपाली जानवळकर (दंतचिकित्सक), श्रीमती वैशाली प्रतीक रहाटे (पोलीस महिला), श्रीमती संगीता संदीप भाटकर (एचपी गॅस एजन्सी), श्रीमती अमृता अंकुश जानवळकर (आशा सेविका), श्रीमती मयुरी महेश शिगवण (सरपंच तळवली), श्रीमती समीक्षा स्वप्नील बारगोडे (सरपंच वेळब ), श्रीमती विजया मैस्त्री (अंध महिला उद्योजक गॅस एजन्सी आणि दुकान) यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

    रात्री ९ वा. पारंपारिक कलागुणांचा कार्यक्रम 'कोकणचा साज 'संगमेश्वरी बाज"' हा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दि. १० मार्च रोजी सायं. ४ वा तीथीनुसार शिवजयंती निमित्त शृंगारतळी मच्छी मार्केट ते मध्यवर्ती संपर्क कार्यालय मनसे गुहागर (शृंगारतळी), पर्यंत भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुका विनोद जानवळकर यांनी केले आहे.