धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून अलिबाग समुद्रकिनार्‍यावर बैलगाडी शर्यतीत बैल घुसले प्रेक्षकांत, दोन वृद्धांचा मृत्यू

 

पेन/लोकनिर्माण ( दिनेश म्हात्रे)

धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून अलिबाग समुद्रकिनार्‍यावर बैलगाडी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. मात्र यादरम्यान बैलगाडीचे बैल उधणून प्रेक्षकांमध्ये घुसल्याने जखमी झालेल्या विनायक जोशी व राजाराम गुरव यांचा मृत्यू ओढवला.



स्पर्धेदरम्यान बैल उधळून प्रेक्षकांमध्ये घुसले. यामध्ये विनायक जोशी (७०) राजाराम गुरव (७५) हे जखमी झाले. त्यांना अलिबाग येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. यापैकी विनायक जोशी यांचा मुंबईत नेताना वाटेतच मृत्यू झाला. तर राजाराम गुरव यांचे बुधवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. यादरम्यान अलिबाग पोलीस ठाण्यात स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस करत आहेत. बैलगाडी स्पर्धेच्यावेळी घडलेली ही चौथी दुर्घटना असल्याने प्रेक्षकांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे.