बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये ‘आझाद हिंद की गाथा’ नाट्यप्रयोगाचे सादरीकरण

 

पाटण लोकनिर्माण प्रतिनिधी

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचनालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि आर्टिस्टिक ह्युमनने आयोजित केलेल्या ‘आझाद हिंदची गाथा या नाट्यप्रयोगासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामधील ७५ महाविद्यालयांनी ७५ ठिकाणी ७५ नाट्यप्रयोग सादर करण्याचा संकल्प केला आहे. यानुसार पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयाने देखील या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. 



गुरुवार दि. २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ‘आझाद हिंदची गाथा’ या नाटकाचा प्रयोग महाविद्यालयाच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात झाला.सदर कार्यक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. पवार व एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. एस. पट्टेबहादूर यांच्या हस्ते झाला. या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण महाविद्यालयाच्या डॉ. जी.एस. पट्टेबहादूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.या नाट्य सादरीकरण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्यसाठीचे योगदान आणि भारतातील सांस्कृतिक विविधता अधोरेखित करण्यात आली आहे.तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर नृत्य देखील केले.

सदर नाट्य प्रयोगाची सांगता व आभार प्रदर्शन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. भरत जाधव यांनी केले. तर नाट्य प्रयोगाचे सूत्र संचालन कु. तनिष्का शिर्के या विद्यार्थिनीने केले.यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. पी.जे. ऐवळे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. संदीप तडाखे,जुनियर विभागचे पर्यवेक्षक प्रा. दीपक दाभाडे, प्रा. बळीराम लोहार, प्रा. अमोल मोहिते, प्रा.सौ. पट्टेबहादूर मॅडम, प्रा. भास्कर रासकर, प्रा. विशाल कांबळे. प्रा. रघुनाथ संकपाळ यांच्याबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.