गुहागर लोकनिर्माण प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील दोडवली मासू वाघांबे कर्दे मार्गाच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या जवळ व्यथा मांडल्या .कर्दे येथे नुकतीच मनसे पदाधिका-यांजवळ नागरिकांनी बैठक घेतली. दोडवली मासू वाघांबे कर्दे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मनसे गुहागरच्या वतीने पं.स.चे गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी, उपअभियंता, प्रधानमंत्री ग्राम- सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था चिपलुन कार्यालय यांच्याकडे निवेदने देण्यात आली होती. या प्रमुख मार्गाची दुरावस्था झाली असून या मार्गा वरून प्रवास करणे घोक्याचे बनले आहे. या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे अन्यथा मनसे आक्रमक पावित्रा घेईल असा निवेदनाद्वारे इशाराही देण्यात आला होता. तसेच या रस्त्याची पाहणी संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी पाहणी केली. तसेच या गावातील नागरिकांच्या भेटीही घेतल्या.
यावेळी या रस्त्यासंदर्भात बोलताना नागरिकांनी सांगितले की, या रस्त्यासाठी आम्ही ग्रामस्थ सर्वच लोकप्रतिनिधीच्या दारात गेलो पंरतु पाहीजे तेवेढा प्रतिसाद कुणीच दिला नाही, गेली १५ वर्षे ग्रामस्थ या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी करत आहेत परंतु जाणीवपूर्वक या रस्त्याचे काम करण्यात आले नाही, आता या रस्त्याची दुरावस्था झाली असून या खड्डेमय रस्त्यावरून वाहनेही येण्यास तयार होत नाहीत, गावातील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत, हॉस्पिटल पर्यंत नेताना रुग्ण जीवंत राहील की नाही ही शंका असते, लोक प्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी पत्र व्यवहार, निवेदने देण्यात आली, या पत्रे, निवेदनाला सर्वांनीच अनास्था दाखविली, या खराब रस्त्यामुळे एस.टी.बंद आहे, शालेय विद्यार्थी, महिला वयोवृध्द नागरिक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, माजी सभापती दत्ता निकम, संतोष रामगडे यांच्या मार्गदर्शानाखाली नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. आता मनसेच्या माध्यमातून तरी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा नागरिकांना आहे.उपस्थित सहसंपर्क अध्यक्ष सुरेंद्र निकम, रमेश कांबळे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.