तांबेडी गावच्या युवकाने मुंबई येथे उद्योगाचा रचला पाया तर गावी चढवला कळस - तांबेडी येथे उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्या मार्गदर्शनाखाली पापड उद्योगाचा केला शुभारंभ


"एक पाऊल पडते पुढे", स्वतःसह पंचवीस महिलांना दिला रोजगार


✒️लोक निर्माण /संगमेश्वर:(सत्यवान विचारे )

आजच्या युगात भूल भुल्लया म्हणुन मुंबई शहाराचे आकर्षण प्रत्येकाला असते, ग्रामीण भागातील तरुण वर्गाचा ओढा मुंबईकडे असल्याने गावातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पारंपारक शेती सोडून मुंबईकडे जाताना दिसतो.  मात्र असे असताना याला अपवाद म्हणजे तांबेडी गावच्या एका युवकांने पाच अंकी पगार सोडून गावची वाट धरली आणि गावातच पापड, कुरडई सारखे उत्पनाचे साधन अंगीकरून गावातच आधुनिक पद्धतीने पापड व्यवासाय सुरु केला आहे. त्यामुळे जवळपास पंचवीसहुन अधिक स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आह




      या विषयी मिळालेल्या माहिती नुसार तांबेडी गावचे युवा उद्योजग श्री. सिद्धेश ब्रीद आणि सतीश धांगडे या जोडगोडीच्या संकल्पनेतून पापड उत्पादनामुळे तांबेडीतील महिलांना  गावातच रोजगार मिळाला आहे.



 श्री. सतीश धांगडे यांनी चार वर्षांपूर्वी मुंबई येथील कायम स्वरूपी असणारी नोकरी सोडून (पाच अंकी पगाराची )गुजरात अहमदाबाद येथे जाऊन पापड उद्योगाचे प्रक्षिक्षण घेऊन विरार येथे स्वतःचा पापडाचा व्यवसाय सुरु केला, त्यामधे त्यांच्या धर्मपत्नीने मोलाची साथ दिली. त्यांच्या पापड, कुरड्या आदी पदार्थांना डी. मार्ट सारख्या मोठ मोठ्या मॉल मधुन मागणी वाढू लागल्याने त्यांनी हा व्यवसाय गावी करण्याची संकल्पना तांबेडी गावचे युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्या कानी घालताच सिद्धेश ब्रिद यांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन मोलाची साथ दिली. आणि तांबेडी गावात पापड उद्योग व्यवसाय उभा राहिला आहे. आज या ठिकाणी जवळपास पंचवीस महिला काम करताना दिसत आहेत.



तांबेडी गावात आता पर्यंत काजू फॅक्टरी, दुग्ध व्यवासाया सारखे छोटे उद्योग होते, मात्र आता सतीश धांगडे सारख्या युवकाने मुंबईत श्री. नवलाई कृपा पापड या नावाने   उद्योगाला सुरवात करुन मार्केटिंग मधे नाव कमावलेल्या व्यक्तीने तांबेडी सारख्या ग्रामीण भागात हा उद्योग करण्याचे धाडस केले आहे.



  या ठिकाणी दरोरोज कमीत कमी पाचशे किलो (मार्केट मधे वाढती मांगणी लक्षात घेता )पापडाचे उत्पादन घेतल्या जाणार असुन सतीश धांगडे यांनी एक प्रकारे नवीन क्रांती घडवली असल्याचे दिसुन येते.

   लवकरच या भागात मिनी MIDC पाहायला मिळेल असा विश्वास सिद्धेश ब्रिद यांनी व्यक्त केला आहे.

 महिलांच्या रोजगारासाठी उद्योजक सिद्धेश ब्रीद यांचे "एक पाऊल पडते पुढे" या उक्ती प्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी सारख्या ग्रामीण भागात श्री.नवलाई कृपा नावाने नुकतीच  पापड उद्योगाला सुरवात करण्यात आली.

   सतीश धांगडे यांनी मुंबई विरार या ठिकाणी या उद्योगाचा पाया रचला तर आज तांबेडी सारख्या ग्रामीण भागात हा उद्योग आणून कळस चडवला आहे असे बोलले जात आहे.



  सिद्धेश ब्रीद यांच्या संकल्पनेतून श्री.नवलाई पापड उद्योग समूहाचा आज शुभारंभ करण्यात आला. त्याचे  उद्घाटन सिद्धेश ब्रीद यांच्या मातोश्री सौ. ब्रीद यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.


  यावेळी युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद, लोक निर्माण या वृत्तपत्राचे संपादक तथा AJFC या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, पत्रकार तथा नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, पत्रकार सत्यवान विचारे, धनाजी भांगे, नवलाई पापड उद्धोजक सतीश धांगडे, काजू व्यावसायिक रवींद्र ब्रीद, व्यावसायिक प्रकाश ब्रीद, प्रदीप सोलकर, माजी सरपंच प्रतीक्षा इचले, नरेश गोसावी, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व गावकर सांगळे, गणपत कांबळे आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.






Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image