नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कार लोकनिर्माण चे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांना जाहीर

 

संगमेश्वर लोकनिर्माण सत्यवान विचारे 



नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कार  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांना जाहीर करण्यात आला आहे.  एजेएफसी ही राष्ट्रीय पत्रकार संघटना आहे. ही संघटना गेली १६ वर्ष पत्रकारांच्या समस्यांसाठी काम करत आहे. या संघटनेत विविध माध्यमांचे दोन हजार हून जास्त पत्रकार सदस्य आहेत. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत आहे. कमी मानधनात तो जीवाची बाजी लावून बातम्या प्रसिद्ध करत असतो. परंतु त्यांच्या पाठीवर कर्तव्याची थाप मारून त्यांना प्रेरणा देण्यासाठी राज्यातील विविध कर्तृत्ववान पत्रकारांच्या नावाने संघटनेत काम करणाऱ्या कर्तृत्ववान पत्रकाराना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. असाच पुरस्कार दैनिक सागरचे संपादक कै. नानासाहेब जोशी यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या संपादकीय आणि पत्रकारितेच्या माध्यमातून परखड लिखाण करुन न्याय मिळवून दिला आहे. 

    अशाच चिपळूण मधील जेष्ठ पत्रकार आणि लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक  बाळकृष्ण कासार यांनी आपल्या लेखनीतून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांना आता पर्यंत ३२ राज्य, तीन राष्ट्रीय आणि दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी पत्रकारीतेत उत्तुंग भरारी घेतली आहे याची जाणीव म्हणून या वर्षाचा  नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कार एजेएफसीचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष कोळी यांनी जाहीर केला आहे. हा कार्यक्रम बुधवार दिनांक ३ मे २०२३ रोजी सायं. ४ वाजता, गांधी बुक सेंटर, ग्रॅन्ड रोड, नाना चौक, मुंबई येथे होणार आहे.