लोटेतील गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासन दखल घेत नसल्याने लोटेत १८ रोजी गोधनासह महामार्ग रोखणार!

 

लोटे/ लोकनिर्माण ( प्रमोद आंब्रे)

लोटेतील गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला ६ दिवस उलटले तरीही प्रशासकीय यंत्रणा अथवा लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याच्या निषेधार्थ १८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता आपल्या गोधनासह महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा कोकरे यांनी दिला आहे. दरम्यान, वारकरी सांप्रदायाने कोकरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे वारकरी सांप्रदायाचे राष्ट्रीय कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी सांगितले.

   गोशाळेच्या जागेचा प्रश्न सोडवा, उर्वरित २५ लाख रूपयांचे अनुदान तत्काळ द्या, या मागणीसाठी गोशाळेतच उपोषणाला बसलेल्या कोकरे यांनी शनिवारी सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले आहे. मात्र या उपोषणाकडे पशुसंवर्धन विभाग वगळता उर्वरित प्रशासकीय यंत्रणा तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनीही फारशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे येत्या २ दिवसांत यासंदर्भात योग्य तो निर्णय न झाल्यास मंगळवारी सायंकाळी गोशाळेतील सर्व गाईना घेऊन महामार्ग रोखणार असल्याचे कोकरे यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले.


Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image