लोकनिर्माण कल्याण प्रतिनिधी सौ.राजश्री फुलपगार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११. ०० वाजता जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शिवाजी चौक, कल्याण (प) येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली.
डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हा कार्याध्यक्ष मा. डॉ. वंडारशेठ पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी सौ. करुणा कातखडे यांनी बुद्धवंदना* बोलून पूजन केले. नंतर प्रदेशने पाठविलेल्या प्रतिज्ञापत्राचे वाचन करण्यात आले. अभिवादन सभेत उपस्थित काही मा. सदस्यांनी बाबासाहेबांच्या तेजस्वी कार्याची महती सांगून उपकृत केले. यावेळी प्रदेश पदाधिकारी सन्मा. रमेश हनुमंते, प्रकाश तरे, संजय राजपूत, जिल्हा पदाधिकारी सन्मा. शरद महाजन, रामचंद्र यावलकर, दिलीप रोकडे, संतोष पाटील, अडवकेट. प्रल्हाद भिलारे, प्रवीण मुसळे, दत्तात्रय दंडगव्हाण, शिक्षक सेलचे प्रवीण खाडे, रविंद्र वेंन्दे, अजय गांगुर्डे, सेवादलाचे शैलेंद्र जोगदंड, महेंद्र जोगदंड, मिथुन पवार, कला- सांस्कृतिक सेलचे हेमंत यादगिरे, करुणा कातखडे, प्रकाश चव्हाण, सिद्धेश यादगिरे व्यापार सेलचे प्रमोद निमेश, अनु. जाती जमाती सेलचे चंद्रकांत सांगळे, ब्लॉकचे उपाध्यक्ष अशोक राजपुत, धनाजी पाटील, सोनू सोनके व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.