वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचे खेर्डीत मोठ्या थाटात उद्घाटन- विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; दुधासह विविध प्रकारचे बायप्रॉडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध

 

चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी 

 मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या खेर्डी येथील शॉपीचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात उद्घाटन झाले. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते फित कापून आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शॉपीचे उद्घाटन करण्यात आले.  



         या उद्घाटन समारंभाला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, संचालक अशोक साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे संचालक तथा काँग्रेसचे नेते प्रशांत यादव, खेर्डीच्या सरपंच सौ. अपर्णा दाते, उपसरपंच विनोद भुरण, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, माजी सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य अबूशेठ ठसाळे, चिपळूण अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नीलेश भुरण, चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, खेर्डीचे माजी सरपंच सुनील मेस्त्री, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, माजी सरपंच रवींद्र फाळके, माजी सरपंच प्रकाश पाथरूड, माजी सरपंच अजित खताते, माजी उपसरपंच बाबू शिर्के, माजी उपसरपंच प्रकाश साळवी, चिंचघरीचे माजी सरपंच रमेश चाळके, खेर्डी ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. सुप्रिया उतेकर, सौ. सुगंधा माळी, ओवी शेट्ये, सदस्य अभिजीत खताते, सदस्य राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, राजेश सुतार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल फाळके, खेर्डी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गजानन जाधव, सतीश शिंदे, व्यापारी लालाशेठ मोरे, अरविंद दाते, रमण डांगे, प्रभात हॉटेलचे मालक महेश जाधव, शिवसेना (ठाकरे गट) युवा नेते उमेश खताते, काँग्रेसचे जिल्हा चिटणीस सुरेश मांदाडकर, एस. आर. पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनंत साळवी, अनिल लांजेकर, अमर थरवळ, सुधीर चव्हाण, व्यापारी धनंजय दाभोळकर, शमसुद्दीन अरकाटे, नवभारत ग्रुपचे सरव्यवस्थापक सचिन फुलपगार, पत्रकार सतीश कदम, राजेंद्रकुमार शिंदे, संतोष सावर्डेकर, वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे संचालक महेश खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, कु. स्वामिनी यादव, जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, अकाउंट मॅनेजर विठ्ठल धामणकर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे तसेचे मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. च्या प्रकल्पाच्या ठिकाणी पहिली शॉपी सुरू झाली. त्यानंतर मार्कंडी येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर, त्यानंतर बहादूरशेख नाका येथे आणि रमजान व गुढीपाढव्याच्या निमित्ताने गोवळकोट रोड येथे चौथी शॉपी सुरू करण्यात आली. अक्षय्य तृतिया व रमजान ईदच्या निमित्ताने काल दापोली येथील शॉपीचे उद्घाटन झाले. त्यानंतर आज खेर्डी येथे सहावी शॉपी सुरू करण्यात आली. या शॉपींमध्ये दुधासह दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, तूप, ताक, फ्लेव्हर्ड मिल्क, पनीर आणि पेढा या दुग्धजन्य पदार्थांसह ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सॉफ्टी आईसक्रीमही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. 

             `वाशिष्ठी`ची गरूड भरारी!

`कणा कणात कोकण` हे ब्रिदवाक्य घेऊन ग्राहकांच्या सेवेत उतरलेल्या वाशिष्ठी डेअरीने सुरुवातीपासूनच आपल्या उत्पादनांच्या दर्जात कोणतीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे वाशिष्ठीची सर्व उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळे अल्पावधीतच वाशिष्ठी डेअरीच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री १८ हजार किलोपर्यंत पोहोचली आहे. ग्राहकांचा हा विश्वास अखंड जपण्याचा प्रयत्न वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून केला जाईल, असा विश्वास वाशिष्ठी डेअरीचे संचालक प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.