रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम - रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम

 

मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी 

 रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. मागील काही दिवसांपासून अनेक कर्मचारी एमआयडीसीमध्ये कंत्राटी पद्धीतीने काम करत होते. सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी होती. 



पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसीने आज रोजी १३ जणांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये चालक, पंपचालक, निरीक्षक, शिपाई, लिपीक आदी पदांचा समावेश आहे. यासोबत राज्याभरातील एकूण ८८ जणांना कायम करण्यात आले आहे. यावेळी एमआयडीसीचे सीईओ बिपीन शर्मा, एचआर विभागाचे महाव्यवस्थापक तुषार मटकर आदी उपस्थित होते.

Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image