कापरे/ लोकनिर्माण( तेजस मोरे)
शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे अंतर्गत उपकेंद्र भिले अंतर्गत गाव धामेली येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच श्री भोजने साहेब यांचे उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले. या वेळी श्री रघुनाथ ठसाळे, मा. उपसरपंच आणि विद्यमान सदस्य रविंद्र तटकरे उपाठीत होते. या मध्ये आरोग्य केंद्र कापरे येथे "सुंदर माझा दवाखाना" या संकल्पनेतून केंद्रांची अंतर्गत व बाह्य परिसराची स्वच्छता करण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभागाने या वर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवा अधिक सुंदर व स्वच्छ व लोकाभिमुख करण्यासाठी ७ ते १४ एप्रिलदरम्यान 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे.
जनतेमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका देखील सहभागी झाले होते. ‘समान आरोग्य सेवा’ हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ राणी नागटिळक, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, श्री. मिलिंद जंगम, श्रीमती सीमा कवठनकर, आरोग्य सेवक श्री. चव्हाण, गटप्रवर्तक श्रीमती वरवडेकर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांनी स्वच्छ्तेसाठी व सुशोभीकरण करण्यासाठी सहकार्य केले.