कोरेगाव लोकनिर्माण ( नामदेव भोसले)
आमदार शशिकांत शिंदे विधान परिषद सदस्य यांच्या फंडातून ८लक्ष मंजूर करण्यात आलेल्या३००मीटर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. हा रस्ता बरेच दिवस प्रलंबित होता. शिरंबे-दुघी रस्ता करण्यात आला.परंतू प्रलंबित असणारा रस्ता पिरसाहेब मंदिर ते फाळके बेंद (रहिमतपूर ते कोरेगाव)रस्त्याला मिळणार आहे.कामाचे स्वरूप मुरुमीकरण खडीकरण, डांबरीकरण होणार आहे.
आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी काम मंजूर करून लगेचच सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे शिरंबे, एकसळ, गोडसेवाडी, दुघी व इतर गांवाना वाहतूकीसाठी व शेतकऱ्यांना या रस्त्याचा भरपूर प्रमाणात उपयोग होणार आहे. यावेळी भुमीपूजन करताना सौ.पदमा भोसले सरपंच, विक्रम गायकवाड उपसरपंच, सौ.द्रौपदा पवार सदस्य, प्रमोद भोसले सदस्य, शरद गुरव सदस्य, सुभाष रोमण सदस्य विक्रांत (वैभव) गायकवाड सोसायटी संचालक,ह.भ.प.नामदेवराव भोसले संचालक सोसायटी संभाजी गायकवाड तंटामुक्त अध्यक्ष, आकाश भोसले अध्यक्ष यात्रा कमिटी, मा.सरपंच सत्यवान भोसले, मा.चेअरमन शंकर भोसले गावातील ग्रामस्थ, वारकरी,तरूण कार्यकर्ते उपस्थित होते.सर्व ग्रामस्था मार्फत आमदार शशिकांत शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले.