पाटण लोकनिर्माण (श्रीगणेश गायकवाड)
पाटण तालुक्यातील मौजे त्रिपुडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४२ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी गावच्या पोलीस पाटील वर्षारानी देसाई, सरपंच नंदा पाटील, उपसरपंच राहुल देसाई, भिकाजी वीर, जनार्धन पवार, भरत पाटील या सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सूत्रसंचालन व आभार भिकाजी वीर सर यांनी केले तर शारदा वीर यांनी बुद्ध वंदना गायले. यावेळी उपस्थित पत्रकार श्रीगणेश गायकवाड, विलास गायकवाड, भीमराव वीर, अरुण चव्हाण, तानाजी गायकवाड, आबासो गायकवाड, विठ्ठल चव्हाण, समीर वीर, मीना सांगवडकर, संगीता वीर, नंदा भोळे, पुतळाबाई वीर, रेखा वीर, आर्या वीर, हर्षद वीर तसेंच त्रिपुडी गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.