श्री देव धूतपापेश्वर, धोपेश्वर मंदिराचे जतन, संवर्धन व परिसर विकासकामे ग्रामस्थांना विश्वासात घेवून करावीत - पालकमंत्री उदय सामंत


रत्नागिरी लोकनिर्माण( सुनील जठार)

 श्री देव धूतपापेश्वर, धोपेश्वर या मंदिराच्या जतन, संवर्धन व परिसर विकास  काम करीत असताना येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन,त्यांना विश्वासात घेऊन  काम करावे, असे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

सस्थान श्री देव धूतपापेश्वर, धोपेश्वर या मंदिराच्या जतन, संवर्धन व परिसर विकास या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.



      पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मंदिराबाबतीत ग्रामस्थांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. मंदिराबाबत कोणताही निर्णय घ्यावयाचा झाला तर ग्रामस्थांना विचारुनच घ्यावा लागेल. मंदिराचे काम करीत असताना  या सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन,त्यांना विश्वासात घेऊन काम करावे.

   पुरातन असलेल्या या मंदिराच्या सुशोभिकरण व संवर्धनासाठी राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. या मंदिराच्या जतन, संवर्धन व परिसर विकासाचा बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. हे काम योग्य प्रकारे होणे आवश्यक असून यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करेल, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

विविध विकासकामांचे भूमीपूजन/लोकार्पण

      राजापूर नगरपरिषद हद्दीतील समर्थ नगर राजापूर येथील बापट यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्याची बांधी बांधणे, मेन रोड NH 66 ते नन्हेसाहेब ब्रीजपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे व जवाहर चौक मुख्य रस्ता ते तालीमखाना रस्त्यास बी.बी.एम. करणे, या कामांचे लोकार्पण राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image