आंदोलनाची सुट्टटी संपली - दिनांक २९ पासून पुन्हा होणार आंदोलनाची सुरवात .डॉ .भारत पाटणकर

 

पाटण लोकनिर्माण ( श्रीगणेश गायकवाड)

     कोयना धरणग्रस्त आणि इतर धरण ग्रस्तांचे  आंदोलन महिना भराच्या सूट्टी नंतर दिनांक २९ एप्रिल पासून पुन्हा सुरू होणार आहे असे तीन मंदिर येथे जमलेल्या कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या ५०० धरणग्रस्त प्रतिनिधींच्या उपस्थितीत  निर्णय घेण्यात आला ,मार्च महिन्यात चालू असलेल्या धरणग्रस्तानच्या आंदोलनाला भेट देऊन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री शंभूराज देसाई  यांनी येत्या एक महिन्याच्या आत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांची बैठक घेऊ असे आंदोलकाना लेखी पत्र  देऊन आंदोलन थांबिविण्याचे अवाहन केले होते. त्यानी पत्रामध्ये असे म्हणले होते की, "राज्यातील पाटबंधारे प्रकल्पामुळे  बाधित झालेल्या प्रकल्प ग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात कोयना नगर येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आपण मागणी केलेल्या निवेदनातील मागण्या संदर्भात शासन स्थरावर मुख्यमंत्री मा.  ना. एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत एका  महिन्याच्या आत  मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल तरी सदरचे बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात यावे ही विनंती" असे आश्वासन दिले होते. त्याला प्रतिसाद म्हणून धरणग्रस्तानी आंदोलनाला सूट्टी जाहीर करून कोयना नगर तीन मंदिर येथे  महिनाभर बाकीची पुनर्वसन संबदित इतर कामे, अर्ज  पूर्तता  करून बैठक नाही झाली तर आहे तसे आंदोलन चालू करणार असे ठरवले होते. त्यानुसार आज पर्यंत काम चालू होते.



   पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिलेल्या  आश्वासनाला २७ एप्रिल रोजी एक महिना होत आहे. त्यानुसार ता. २९ एप्रिल पासून कोयनानगर येथे मोठ्या संख्येने आंदोलनाला सुरुवात करून न्याय मिळत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार केला आहे.  आणि आंदोलनाचा सुरु झालेला दुसरा टप्पा हा न्याय मिळवूनच थांबेल. असा इशाराही जमलेल्या प्रकल्पग्रस्तांनी यावेळी सरकारला दिला.

   या मेळाव्यास श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष  डॉ. भारत पाटणकर  व प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. 

    यावेळी संतोष गोटल सचिन कदम, महेश शेलार, श्रीपती माने,  सीताराम पवार, दाजी पाटील, राम कदम, दाजी शेलार, पि डी लाड  ,तानाजी बेबले, जयवंत लाड ,अनिल देवरुखकर , अनुसया कदम वासंती विचारे कमल कदम जगुबाई कदम उपस्थित होते.