राजापूर एसटी आगारातून सुटणा-या अनियमित बस फे-या बाबत आ. शिवसेना उपनेते डॉ. राजन साळवी यांनी घेतली भेट


 राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार)


    राजापूर एसटी आगार मधून सुटणाऱ्या अनियमित बस फेऱ्या व त्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार वर्ग , ग्रामस्थ यांच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांनी काल आगार व्यवस्थापक शुभांगी पाटील यांची भेट घेऊन आढावा घेतला  व बहुतांशी विषयावर चर्चा करून सकारात्मक तोडगा विवीध ग्रामस्थांचे विषय मार्गी लावले. तसेच एस टी कामगार सेना कर्मचारी यांचे देखील विषय जाणून घेऊन त्याच्या अडीअडचणी संदर्भात वरीष्ठ अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली. त्याप्रसंगी युवासेना उप जिल्हा युवाधिकारी तथा विभागप्रमुख संतोष हातणकर, माजी सभापती अभिजीत तेली, उप शाखाप्रमुख संदीप कोरगावकर, गौरव सोरप, स्थानकप्रमुख सचिन मोरे, कार्यशाळाप्रमुख प्रकाश झोर, वरिष्ठ लिपीक सुबोध बाकाळकर व अन्य ग्रामस्थ,कर्मचारी उपस्थित होते.