श्री स्वामी समर्थ ह्रदयस्थ सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न!

 श्री स्वामी समर्थ ह्रदयस्थ सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न!

     राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार)

अक्कलकोट निवासी श्री. स्वामी समर्थ यांचा समाधीलीला दिन  १८ एप्रिल २०२३ रोजी काळाचौकी अभ्युदय एज्युकेशन हायस्कूल, बँक्वेट हॉल येथील स्वामीभक्त मेळ्यात अनेक कार्यक्रम  घेऊन भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ज्यामध्ये प्रामुख्याने स्वामी पादुका पूजन, अभिषेक, आरत्या, भजन, महाप्रसाद आणि पुस्तक प्रकाशन असे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

 "श्री स्वामी समर्थ हृदयस्थ" हे स्वामी समर्थ अनुभव लेख संग्रहाचे प्रकाशन स्वामी समाधी लिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. हे अनुभव लेखन सर्वसामान्य गृहिणींपासून उच्च पदस्थ व्यक्तींनी स्वतःच्या अनुभवांच्या आधारे केलेले आहे. हा लेखन उपक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, राजापूर तालुका शाखेमार्फत  घेण्यात आला. सदर लेख संग्रह पुस्काची प्रस्तावना  डाॅ. सौ.अलका नाईक यांची आहे. संपादन माधुरी प्रल्हाद खोत स्वामीभक्त यांनी केलेले असून सौ.लता गुठे या प्रकाशिका आहेत. सौ.सुयोगा सुनिल जठार अध्यक्ष अभामसाप राजापूर तसेच पत्रकार श्री. रविंद्र देशमुख, श्री हेरंब लिमये प्रमुख पाहुणे लाभले होते. विविध ठिकाणांहून बहुसंख्य स्वामीभक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. या लेखसंग्रहाचे संपूर्ण संकलन व इतर सर्व व्यवस्थापनाचे विशेष काम सौ.श्रद्धा स.पाटील उपाध्यक्षा अभामसाप राजापूर व सौ.संगिता लि.धावले यांनी करवून घेतले. श्री प्रकाश प्र. रावराणे यांनी मुद्रक म्हणून काम करुन दिले.



          यावेळी उपस्थित श्री. हेरंब लिमये, श्री. रविंद्र देशमुख, सौ. लता गुठे, डॉ. अलका नाईक, सुयोगा जठार, सौ. श्रद्धा पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात या पुस्तकाचे, कार्यक्रमाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये याबाबत उत्तम विवेचन केले. 



           या उपक्रमाच्या निमित्ताने अभामसाप राजापुर शाखेमार्फत सर्व निमंत्रित सन्माननीय स्वामीभक्त अनुभव लेखक यांना सन्मानपत्र प्रदान करून सन्मानीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगीता धावले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजा काळे यांनी केले.



          'श्री स्वामी समर्थ हृदयस्थ' या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यातील असलेले अनुभव लेखन हे प्रत्येकाचे स्वतःचे अनुभव असून त्यामधे कोणत्याही प्रकारचा बदल (एडिट) न करता जसेच्या तसे छापण्यात आले आहेत. तसेच या सर्व लेखन करणाऱ्या व्यक्ती या लेखक म्हणून प्रसिद्ध नसून समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. 'स्वामीभक्ती' हा एकच समान दुवा या सर्वांमधे आहे. या ह्रदयस्थ स्वामीभक्तीमुळे सर्व साधक भक्त भेदभाव विरहित अशा एकाच समान पातळीवर कार्यरत आहेत.

        आणखीन एक वैशिष्ट्य होते कार्यक्रमात.. जे सामान्यतः आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यक्रमात दिसत नाही. देव, देश आणि धर्म ही त्रयी कधीच विसरता येत नाही किंबहुना विसरुन चालणारही नाही. आरत्या झाल्यानंतर सर्वांनी (सामुदायिक) राष्ट्रगीत गायन केले.. आणि जय हिंद, वंदेमातरम् घोषणाही दिल्या.

#श्री_स्वामी_समर्थ_जय_जय_स्वामी_समर्थ! 


 ✍🏻 शब्दांकन :- सुयोगा जठार, राजापूर