चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी
चिपळूण मधील रंगभूमी थिएटर नाट्य कलाकारांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवलं आहे. त्यातील एक एकांकिका आहे सप्तपदी ...
या "सप्तपदी" एकांकिकेचा पहिलाच प्रायोगिक नाटक शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री आठ वाजता मुंबई मराठी साहित्य संघ मंदीर, डॉ. अ. ना. भालेराव सभागृह, चर्नी रोड मुंबई येथे संपन्न होणार आहे.
या नाटकाचे लेखक - दिग्दर्शक अनिकेत खेडेकर, रितेश पिटले असून या प्रायोगिक नाटकामध्ये चिपळूणचे सर्व कलाकार सादरीकरण करणार आहेत. या प्रयोगासाठी लेखक - दिग्दर्शक - माननीय यशवंत माणके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रायोगिक नाटकासाठी पाहिलं पाऊल टाकणाऱ्या चिपळूणच्या या सर्व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आवर्जुन उपस्थित राहावे असे संतोष गायकर यांनी आवाहन केले आहे.