कापरे / लोकनिर्माण ( तेजस मोरे)
श्री देव नागार्जुन कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष गावामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत विविध विकासकामे केली जात आहेत पायवाट बांधणे, विसर्जन घाट, सौर दिवे बसवण्यात आले, सार्वजनिक ठिकाणी लोकांना बसण्याची व्यवस्था, बस स्टॉप, कोरोना काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे कॉमेडी सेंटर तयार करण्यात आले, बरीचशी समाज उपयोगी कामे मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात या वेळेला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कापरे देऊळवाडी या ठिकाणच्या अंगणवाडी मध्ये लाईटची व्यवस्था नव्हती आणि त्याचा त्रास त्या ठिकाणी लहान मुलांना होत होता मग मच्छर असेल किंवा उन्हाळ्यातील गरमी असेल आणि ही गोष्ट लक्षात येताच, तत्पर या गोष्टीचा पाठपुरावा करून, अनेक देणगीदार दात्यांच्या सहकार्यातून खास करून उमेश शेठ सकपाळ चिपळूण नगरपरिषद माजी समाज कल्याण सभापती, श्री मनोज सावंत कापरे गावचे सुपुत्र, श्री समीर मोरे, श्री शिवाजी आंबेडे, बंधू नारकर चिपळूण, श्री मिलिंद ढवण कापरे,राजा माळी मालदोली, या देणगीदार दातांचे महत्त्वाचे योगदान लाभले ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांच प्रोत्साहन आणि मार्गदर्शन या मुळे हे काम वेळेत पूर्ण करु शकलो, हे काम पूर्ण करण्यासाठी मनोज सावंत, मिलिंद ढवण, प्रशांत मोरे, अभि मोरे,आदित्य मोहिते, समर्थ मोरे, श्री साई मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.