राजापूर / लोकनिर्माण (सुनील जठार)
गतवर्षी प्रमाणे यावर्षीही हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालाधीत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावयाचा आहे. राजापूर नगर परिषदेने देखील या हर घर तिरंगा उपक्रमाची प्रभावी जनजागृती केली आहे.
राजापूर नगर परिषदेने हाती घेतलेल्या या उपक्रमाला माजी नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे यांनी साथ देत या उपक्रमासाठी आवश्यक असलेला तिरंगा ध्वज राजापूर शहरातील नागरिकांना मोफत घरपोच वितरीत करण्याचा संपकल्प सोडून तो पुर्णत्वाला नेला आहे. ज्या नागरिकांना तिरंगा ध्वज हवा असेल त्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आपल्या घरी तो पोहच केला जाईल असे आवाहन ॲड. खलिफे यांनी केले होते. त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी ॲड. खलिफे यांच्याशी संपर्क साधल्यावर ॲड. खलिफे यांनी तातडीने त्या नागरीकांना घरपोच तिरंगा ध्वज उप्लब्ध करून दिला आहे.
हा तिरंगा ध्वज उपलब्ध करून देताना त्यांनी तिरंगा ध्वज फडकविताना कशा प्रकारे काळजी घ्यावी याचीही माहिती नागरीकांना दिली आहे. राष्ट्रध्वज हाताने तयार केलेले अथवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क किंवा खादी पासून बनविलेले असावेत .ध्वज स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. ध्वज उतरवताना सावधानतेने व सन्मानाने आणि उतरवावा, केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणे ध्वज फडकवावा. ध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित व सुरक्षित ठिकाणी ठेवावा. ध्वज कोणत्याही परिस्थितीत फाटणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच सदर कार्यवाही करीत असताना भारतीय ध्वजसंहिता याचे पालन व्हावे व जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आपण उभारलेल्या राष्ट्रध्वजाचे तसेच इतर उपक्रमांचे छायाचित्र , चित्रफिती इत्यादी केंद्र शासनाच्याwww.amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करावे.
तरी सर्व राजापूरवासीयांनी या अमृतमहोत्सवी उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ॲड. खलिफे यांनी केले आहे.