आंबेड येथे शिवसेना रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न!

 

संगमेश्वर /लोकनिर्माण( वैभव मुरकर)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची नावडी पंचायत समिती गणाची आंबेड येथे शिवसेना रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या मार्गदर्शना खाली सभा पार पडली

    


  या वेळी नावडी पंचायत समिती गणाच्या नवनियुक्त्या पार पडल्या नावडी पं. स. उपविभाग प्रमुख म्हणून नथुराम पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपविभागीय संघटक पदी सिद्धेश सावंत यांची निवड करण्यात आली. यासभेला मार्गदर्शन करताना राजेंद्र महाडिक यांनी कार्यकर्त्यांमध्ये स्पुर्ती आणण्याचे काम केले. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेच्या पुत्राला त्रास दिला त्यांना त्यांची जागा दाखवून बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. तेव्हा आता पासून कामाला लागा. महागाईवर भाष्य करताना गरिबांच कंबरड या केंद्रातील सरकारने मोडलं आहे.

      या वेळी नावडी कसबा जि. प. गटाचे उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर यांनी सभेला मार्गदर्शन केले घाणेकर यांनी यावेळी उद्धव ठाकरेच्या आणि राजेंद्र महाडीक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया आणि भगवा फडकवूया. सच्चा शिवसैनिक कुठेही गेलेला नाही तो ओरिजिनल शिवसेनेतच आहे.

    या वेळी महिला उपतालुका प्रमुख मनीषा बने, उपविभाग प्रमुख पूजा शिंदे,वांद्री माजी सरपंच अनिशा नागवेकर तसेच उपविभागीय संघटक सिद्धेश सावंत, संगमेश्वर शहर संघटक वैभव मुरकर, खाडी विभाग प्रमुख अशोक पांचाळ, कोळंबे पडवळ वाडी प्रमुख पडवळ , बौध्दवाडी प्रमुख मोहिते, जेष्ठ शिवसैनिक बोट, निसार केळकर, दिनेश गुरव आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image